

नरेंद्र मेहतांच्या जनता दरबारात सरनाईकांच्या विरोधात तक्रारी
भाईंदर, ता. २२ (बातमीदार) : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गेल्या आठवड्यात आयोजित केलेल्या लोकदारबारात आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात तक्रारी आल्या होत्या. आता बुधवारी (ता. २२) मेहता यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात प्रताप सरनाईक यांच्याविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे दोघांनी आयोजित केलेल्या दरबारांच्या माध्यमातून एकमेकांवर निशाणा साधला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपच्या मिरा रोड येथील मध्यवर्ती कार्यालयात आमदार नरेंद्र मेहता यांनी लोकदरबाराचे आयोजन केले होते. या वेळी १७३ नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रकल्पाबाबतदेखील तक्रारी करण्यात आल्या. प्रताप सरनाईक नियमाचे उल्लंघन करून चेना गावात भव्य प्रकल्प उभारत आहेत. हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून आहे. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असताना प्रकल्पाला परवानग्या कशा मिळतात, असा प्रश्न जनता दरबारात उपस्थित झाला. त्याचप्रमाणे सरनाईक यांनी सरकारी जागेवर हॉटेल उभारले आहे. या अनधिकृत हॉटेलबाबत अनेक दिवसांपासून तक्रार करूनही प्रशासन कारवाई करीत नाही, अशीदेखील तक्रार लोकदरबारात करण्यात आली. त्यावर तक्रारीची शहानिशा करून मगच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन आमदार नरेंद्र मेहता यांनी संबंधितांना दिले.
याव्यतिरिक्त महापालिका, पोस्ट ऑफिस, पोलिस ठाणे, तहसीलदार कार्यालय, तलाठी कार्यालय, इमारतीचे प्रश्न, सोसायटीमधील वाद, रजिस्टर यांसारख्या अनेक तक्रारी लोकदरबारात उपस्थित करण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.