

नवी मुंबईमध्ये एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क उभे राहणार
सिडकोतर्फे प्राथमिक टप्प्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती मागवली
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ : नवी मुंबईमध्ये नियोजित भव्य एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क प्रकल्पाच्या प्राथमिक टप्प्याकरिता सिडकोकडून स्वारस्य अभिव्यक्ती मागवण्यात आली आहे. सिडकोतर्फे नवी मुंबईमध्ये भव्य एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्कच्या प्राथमिक टप्प्याचे नियोजन केले आहे.
सिडकोने पुष्पक नोडमधील चिर्ले गावाजवळ सुमारे ३७४ हेक्टर जमीन एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क (आयएलपी) विकसित करण्यासाठी राखीव ठेवली आहे. या प्रकल्पांतर्गत विकसित होणारऱ्या क्षेत्रावर आवश्यक पायाभूत सुविधा, सामाजिक सुविधा, सामायिक सुविधा आणि उपयुक्तता जाळ्यांचा समावेश असेल.
या प्रकल्पासाठी जमीन वाटप, विकास आणि वितरण हे महाराष्ट्र शासनाच्या एमआयडीसी पास-थ्रू धोरणानुसार करण्यात येणार आहे. यासाठी सविस्तर मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून संपूर्ण क्षेत्र सात लॉजिस्टिक्स झोनमध्ये विभागण्यात आले आहे. सर्व भूखंडांना सुलभ जोडणी मिळावी, यासाठी ४५ मीटर आणि ३० मीटर रुंदीच्या रस्त्यांचे प्राथमिक जाळे प्रस्तावित करण्यात आले आहे.
प्राथमिक टप्प्यात, सिडकोने स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे लँड पार्सल एल-१ मधील सुमारे ७२ हेक्टर (१७९.२९ एकर) क्षेत्रातील १२ भूखंडांसाठी स्वारस्य अभिव्यक्ती आमंत्रित केली आहे. या प्रकल्पासाठी रस्ते, पाणीपुरवठा व्यवस्था, मलनिस्सारण जाळे आणि पावसाच्या पाण्याचा निचरा यांसारख्या मूलभूत पायाभूत सुविधा सिडकोकडून विकसित करण्यात येतील. निवड प्रक्रियेनंतर, यशस्वी अर्जदार आणि सिडको यांमध्ये सामंजस्य करार (एमओयू) करण्यात येईल. ज्यामध्ये संबंधित भूखंडाच्या शुल्क भरणा आणि अधिग्रहणासंबंधी अटी नमूद असतील. महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरण आणि त्यातील पुढील अद्ययावतीकरणानुसार या प्रकल्पांतर्गत लॉजिस्टिक्स आणि संबंधित लाइट इंडस्ट्रीज, वेअरहाउसिंग, लॉजिस्टिक्स पार्क, कंटेनर फ्रेट स्टेशन, इनलँड कंटेनर डेपो आणि इतर पायाभूत सुविधा विकसित करण्यात येतील. हा उपक्रम नवी मुंबईला राष्ट्रीय स्तरावरील लॉजिस्टिक पार्क म्हणून अधिक बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. कार्यक्षम, एकात्मिक आणि भविष्याभिमुख मालवाहतूक पायाभूत सुविधा विकसित करण्यास चालना देणारा आहे. यासोबतच, सिडकोतर्फे एज्युकेशन सिटी, मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी आणि एंटरटेनमेंट अरेना यांसारख्या महत्त्वाच्या सामाजिक पायाभूत प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रदेशाचा एकूण विकास अधिक सक्षम होणार आहे. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पूरक पायाभूत सुविधांच्या बळावर हे सर्व प्रकल्प नवी मुंबईला एक सर्वसमावेशक शहरी व आर्थिक केंद्र म्हणून घडवतील, विकासाला गती देतील आणि शहराला नव्या उंचीवर नेतील.
—————————————————————
एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्कच्या विकासाद्वारे, सिडको कार्यक्षम मालवाहतूक सुलभ करणारी, गुंतवणूक आकर्षित करणारी आणि आर्थिक विकासाला चालना देणारी भविष्याभिमुख परिसंस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्राथमिक टप्पा हा या क्षमतेला चालना देत नवी मुंबईला राष्ट्रीय स्तरावरील लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
- विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.