

कोनसईत निष्पाप तरुणांचा बळी
भूमिपुत्र एल्गार संघटना आक्रमक, आर्थिक मदतीची मागणी
वाडा, ता. २३ (बातमीदार)ः वाडा तालुक्यातील कोनसईत फटाके कारखान्यात झालेला स्फोट प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे झालेला आहे. या स्फोटात जीव गमवणाऱ्या मृतांच्या वारसांना ५० लाख, जखमींना १० लाखांच्या मदतीची मागणी भूमिपुत्र एल्गार संघटनेने केली आहे.
औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या असुरक्षिततेबाबत एप्रिलच्या सुरुवातीलाच धोक्याचा इशारा दिला होता. तरीही प्रशासनाने कोणत्याही प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही. या घटनेत भावेश वावरे, मोनिका पडवळेचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, भावेशचे १ मे रोजी लग्न होणार होते, पण काळाने त्याच्यावर झडप घातल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणात भूमिपुत्र एल्गार संघटनेने बेकायदा उद्योगाकडे कानाडोळा करणारे अधिकारी तसेच कारखाना मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करताना भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वाडा तालुक्यातील सर्वच उद्योगांचे तात्काळ सुरक्षा लेखा परीक्षण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.