

ठाणे, ता. २३ : रेल्वे स्थानकावरील गर्दीचा फायदा घेत चोरट्याने जोगेश्वरी पूर्व येथील लतिका मोरे (४३) या महिलेच्या पर्समधून सोन्याच्या बांगड्या चोरल्याची घटना घडली. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मोरे या २० एप्रिलला नेत्रावती एक्स्प्रेसने ठाणे येथे उतरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकलमध्ये चढल्या. गर्दीत त्यांना पर्स उघडी असल्याचे लक्षात आले. तपासणी केली असता पर्समधील सोन्याच्या चार बांगड्या गायब झाल्याचे लक्षात आले. फलाटावर शोध घेतल्यावर सोनसाखळी सापडली; मात्र बांगड्या सापडल्या नाहीत. बांगड्यांची किंमत एक लाख १२ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.