मुंबईकरांच्या सेवेसाठी मराठी रिक्षाचालक सक्षम भूमिकेत

मुंबईकरांच्या सेवेसाठी मराठी रिक्षाचालक सक्षम भूमिकेत
Published on

मराठी सक्‍तीसाठी आम्‍ही रस्त्यावर उतरू!
मराठी रिक्षाचालकांची आंदोलनासह मुंबईकरांना अतिरिक्त सेवा देण्याची तयारी
नीलेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
घाटकोपर, ता. २३ ः राज्यात रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषा येणे बंधनकारक करण्याच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला असून, या निर्णयाच्या विरोधात राज्यातील सुमारे १५ लाख रिक्षाचालकांनी ४ मे रोजी संप पुकारण्याची घोषणा केली आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी १ मे महाराष्ट्रदिनापासून या नियमाची कडक अंमलबजावणी केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच, विशेष तपासणी मोहीम राबवून नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, आंदोलनाची तयारी सुरू आहे.
या निर्णयाबाबत रिक्षाचालकांमध्येच मतभेद असल्याचे समोर आले आहे. अन्य रिक्षाचालकांनी मराठी भाषेच्या सक्तीचे समर्थन करत प्रशासनाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. मराठी रिक्षाचालक यांनी प्रशासनाच्या मराठी सक्तीच्या निर्णयाच स्वागत केले आहे. मराठी भाषेला डावलून कुणी आंदोलन करणार असतील, तर अख्खा महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल. सोशल मीडियावरदेखील या निर्णयाच स्वागत केले जात असून, अनेकांनी समर्थनदेखील दर्शवले आहे, तर मराठी रिक्षाचालक मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी ढाल बनण्यास आपली तयारी दर्शवत आहेत. उपनगरातील काही मराठी रिक्षाचालकांची प्रतिक्रिया या वेळी जाणून घेतली.

मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे. कोणत्याही राज्यातून आलेल्या नागरिकांनी तिचा आदर राखला पाहिजे. मराठी भाषेला सन्मान मिळायलाच हवा.
- नंदकुमार टिपू, रिक्षाचालक (पंतनगर)

प्रत्येक राज्याची एक राजभाषा असते. त्यानुसारच त्या राज्याचा शासकीय राजकारभार चालत असतो. उद्या यांनी आंदोलन पुकारले, तर आम्ही मराठी रिक्षाचालक आमच्या भाषेसाठी, सामान्य मुंबईकरांसाठी आठ तासांच्या जागी १२ तास रिक्षा चालवू.
- चंद्रकांत वाघ, रिक्षाचालक (रमाबाई नगर)

सरकारचा निर्णय धुडकावून जर कुणी आंदोलनाला उतरत असतील, तर आम्ही मराठी रिक्षाचालक आमच्या भाषेसाठी रस्त्यावर उतरून मुंबईकरांना सेवा देण्यास सक्षम आहोत. हीच ती वेळ आहे. प्रत्येक वेळी हे लोक मराठी सक्तीला विरोध दाखवत असतील ते मराठी माणसाने मोठ्या संख्येने एकवटले पाहिजे.
- दिलीप गावडे, रिक्षाचालक (भटवाडी)

त्यांच्या आंदोलनाचा काही फरक पडणार नाही. सरकारनेदेखील त्यांच्या निर्णयावर ठाम रहावे. ते १५ लाख जण आंदोलने करणार असतील, तर हा महाराष्ट्र आहे. अख्खा महाराष्ट्र रस्त्यावर उतरल्‍यास काय होईल, याचा विचार करावा. आम्ही सक्षम आहोत.
- राजेश नवले, रिक्षाचालक (बर्वेनगर घाटकोपर पश्चिम)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com