

महिला रोजगाराला चालना
वाळवणातून पारंपरिक पदार्थांची निर्मिती
विक्रमगड, ता. २३ (बातमीदार)ः बदलत्या जीवनशैली, नोकरीच्या व्यापामुळे अनेक गृहिणींना पापड, कुरडया, सांडगे, शेवया तसेच पापड्यांसारख्या पारंपरिक पदार्थांची निर्मिती करता येत नाही, पण हीच संधी साधत गाव-खेड्यांत महिला बचत गटांच्या माध्यमातून वाळवण उद्योगाला मोठी चालना मिळत असून, अनेक महिलांना रोजगाराचे नवा पर्याय खुला झाला आहे.
उन्हाळ्यात धान्य वाळवून त्यांचे सांडगे, कुरडया केल्या जातात. एप्रिल-मे नंतर घरोघरी यासाठीची लगबग सुरू होते. सणांच्या वेळी नैवेद्यासाठी खास करुन होळीच्या सणाकरिता पापड्यांचा नैवेद्य दिला जातो. पूर्वी घरासमोर अंगणावर वाळवण हे नित्याची बाब होती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. महिला नोकरी करू लागल्याने सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये अनेक महिला दुकानातील तयार पदार्थ विकत घेत आहेत. या माध्यमातून बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
--------------------------
२५० ते ३०० रुपये शेकडा
विक्रमगड, जव्हार भागात नागली, तांदळापासून महिला पापड्या बनवण्याचे काम करतात. होळीच्या सणाला प्रामुख्याने अशा वस्तू बाजारात विक्रीसाठी येतात. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे वाळवणाच्या किमतींवर त्याचा स्पष्ट परिणाम दिसत आहे. गेल्या वर्षी वाळवण शेकडा १५० ते २०० पर्यत मिळत होते, पण आता २५० ते ३०० रुपये शेकडा मोजावे लागत आहेत
----------------------------------------------------------------
महिला बचत गटामार्फत वेगवेगळे पदार्थ बनवून देतो. त्यामुळे आम्हाला चांगले पैसे मिळत आहेत.
- वैशाली सांबरे, अध्यक्ष, गृहलक्ष्मी बचत गट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.