

नळजोडणीच्या कामाला गती
खोडाळातील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार
मोखाडा, ता. २३ (बातमीदार) : मोखाड्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा गावचे जलशुद्धीकरण केंद्र बंद पडल्याने येथे अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत होता. त्यामुळे येथील नागरिकांनी आपली समस्या खासदार डॉ. हेमंत सवरांकडे मांडली. त्यांनी तातडीने दखल घेत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रशासनाला शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांना नळजोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, खोडाळा येथील ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळणार आहे.
खोडाळा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या नळ योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र बंद पडले आहे. त्यामुळे गावाला गाळ मिश्रित दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत होता. परिणामी नागरिकांना पोटाचे विकार बळाऊ लागले होते. आपल्या गावातील ही गंभीर समस्या येथील ऊपसरपंच उमेश येलमामे व काही सजग नागरिकांनी खासदार डॉ. हेमंत सवरांकडे मांडली. त्याची सवरा यांनी तातडीने दखल घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला येथे शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. अंदाजपत्रकात या वाढीव कामाचा समावेश नसताना, संबंधित प्रशासन आणि कंत्राटदाराने नळजोडणी व यंत्रसामग्रीची जमवाजमव केली. मुख्य नळ जोडणीतून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन मुख्य जलकुंभांना नळजोडणी करून घेण्यात आली आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच खोडाळा ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळणार आहे.
-----------------------
खासदार डॉ. हेमंत सवरांनी आमच्या गावची ज्वलंत समस्या सोडवून शुद्ध पाण्याचा स्रोत निर्माण करून दिला आहे. हे काम तीन ते चार दिवसांत पूर्ण होणार असल्याचे प्रशासन आणि कंत्राटदारांकडून सांगण्यात आले आहे. खासदारांच्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागल्याने खोडाळावासीयांनी त्यांचे आभार मानले आहेत.
- उमेश येलमामे, उपसरपंच, खोडाळा ग्रामपंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.