

राज्य महामार्गावर कसोटी
डहाणू-चारोटी यादरम्यान रस्तेदुरुस्ती संथ गतीने
कासा, ता. २३ (बातमीदार)ः डहाणू-चारोटी राज्य महामार्गावर दुरुस्ती तसेच काँक्रीटीकरणामुळे प्रवास अत्यंत धोकादायक झाला आहे. वर्षभरापासून विविध ठिकाणी दुरुस्ती, मोऱ्या बांधणे, काँक्रीटकरणाची कामे संथ गतीने सुरू असल्याने वाहन चालवताना चालकांना कसब पणाला लावावे लागत आहे.
डहाणू-चारोटी राज्य मार्गालगत असलेल्या मोठ्या झाडांच्या तोडीस परवानगी उशिरा मिळाल्याने कामे अर्धवट राहिली होती. सध्या झाडतोड पूर्ण झाली असली, तरी उर्वरित कामांचा वेग मंदावल्याने पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण होतील की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दीड महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला असताना कामे अपूर्ण राहिल्यास रस्त्यावर पाणी साचून चिखलमय परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात शाळकरी विद्यार्थी, कामगार व नागरिक दररोज प्रवास करतात. मात्र, सध्या अनेक ठिकाणी खड्डे, अर्धवट कामे आणि धोकादायक पूल यामुळे प्रवास अत्यंत त्रासदायक झाला आहे. पूर्वीचा ४० मिनिटांचा प्रवास आता सव्वा ते दीड तास लागत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
---------------------
अपघाताचा धोका
- रानशेत येथील सुसरी नदीवरील पूल जीर्ण अवस्थेत आहे. तसेच सारणी गावाजवळील वळणावर सूर्या प्रकल्पाच्या कालव्याला संरक्षक कठडा नसल्याने अपघाताचा धोका आहे.
- विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनांचे नियंत्रण सुटल्यास थेट कालव्यात कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. वढणा पुलावरील लोखंडी बॅरिकेड्स तुटल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
--------------------------
पावसाळ्यात परीक्षा
सध्या सुरू असलेल्या कामांमुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. वाहनचालकांनी धोकादायक ठिकाणी सूचनाफलक, प्रकाश व्यवस्था, सुरक्षा उपाय तत्काळ उभारण्याची मागणी केली आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी सुरक्षित प्रवासासाठी रस्ता तयार करण्याची मागणी होत आहे.
---------------------------
डहाणू-चारोटी मार्गावर कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
- नितीन पगारे, उपकार्यकारी अभियंता, डहाणू बांधकाम विभाग
----------------
अनेक ठिकाणी खड्डे, अर्धवट मोऱ्यांमुळे प्रवास धोकादायक झाला आहे. रात्री सूचनाफलक, प्रकाश व्यवस्था करावी. पावसाळ्यापूर्वी रस्तेदुरुस्ती झाली नाही, तर परिस्थिती गंभीर होईल.
- राजकुमार गिरी, वाहनचालक
फोटो..
३. नितीन पगारे बांधकाम विभाग अधिकारी.
४. राजकुमार गिरी वाहनचालक स्काय ब्लू शर्ट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.