ठाण्यात एसीबीची कारवाई

ठाण्यात एसीबीची कारवाई
Published on

ठाण्यात एसीबीची कारवाई
दोन जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना लाचप्रकरणी अटक

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : ठाणे जिल्हा परिषदेच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) अटक करण्यात आली आहे. शिक्षण विभाग कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी शंकर सोमनाथ आरे (४४) आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीकांत अनंत खंडागळे (५६) या अधिकाऱ्यांना लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (ता. २२) करण्यात आली असून, याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार ६२ वर्षीय असून, त्यांची विभागीय चौकशी चालू असून, ती बंद करण्याकरिता तसेच सेवानिवृत्तीनंतरचे अशंदान व उपदान काढून देण्यासाठी या अधिकाऱ्यांनी एकूण एक लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी काही रक्कम पूर्वी घेतल्यानंतर उर्वरित २० हजार रुपयांची मागणी करण्यात येत होती. याबाबत तक्रारदार यांनी २१ एप्रिलला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) लेखी तक्रार दाखल केली. त्या तक्रारीनुसार २२ एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला. या सापळा कारवाईत शंकर आरे यांना तक्रारदार यांच्याकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. श्रीकांत खंडागळे यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आल्याची माहिती ठाणे एसीबीकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com