भरधाव स्कूटीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

भरधाव स्कूटीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
Published on

नवी मुंबई (वार्ताहर) : सीवूड्स परिसरात एका भरधाव स्कूटीने दिलेल्या धडकेत ४७ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एनआरआय सागरी पोलिसांनी स्कूटीचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुंडलिक विठ्ठल सोनावणे हे सीवूड्स सेक्टर-३६ करावे गाव येथील शिवशंकर अपार्टमेंटमध्ये राहत होते. रविवारी (ता. १९) सायंकाळी ते करावे भागातील गणेश मैदानाजवळून पायी जात होते. या वेळी त्यांच्या मागून आलेल्या एका स्कूटीचालकाने त्यांना जोराची धडक दिली. त्यानंतर स्कूटीचालकाने जखमी सोनावणे यांना रुग्णालयात नेण्याऐवजी किंवा अपघाताची माहिती पोलिस ठाण्यात देण्याऐवजी तिथून पळ काढला. गंभीर दुखापत झालेल्या सोनावणे यांचा उपचारादरम्यान बुधवारी (ता. २२) मृत्यू झाला. पोलिस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार स्कूटीचालकाचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com