नागरिकांची वाट बिकट, पालिकेच्या अर्धवट कामामुळे प्रचंड त्रास

नागरिकांची वाट बिकट, पालिकेच्या अर्धवट कामामुळे प्रचंड त्रास
Published on

नागरिकांची वाट बिकट
पालिकेच्या अर्धवट कामामुळे प्रचंड त्रास

मालाड, ता. २३ (बातमीदार) : मालाड पश्मिच येथील मालवणीच्या साने गुरुजी वसाहतीत पालिकेच्या अर्धवट व निकृष्ट कामामुळे नागरिकांची वाट बिकट झाली आहे. सुमारे दीड महिन्यापूर्वी पालिकेच्या रस्ते विभागामार्फत येथे रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले. मात्र, या कामामुळे ब्लॉक क्रमांक २ आणि ३, तसेच ३ आणि ४ दरम्यानचा रस्ता असमतोल झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

रस्त्याची पातळी एक ते दीड फूट उंच झाल्याने ये-जा करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि गरोदर महिलांना या उंच-सखल रस्त्यावरून चालताना सावरून जावे लागते. गुडघ्यांच्या आजारांनी त्रस्त असलेल्या वृद्धांना तर कोणाची तरी मदत घेतल्याशिवाय हा रस्ता ओलांडता येत नाही. हा अंतर्गत रस्ता असला तरी परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या भागात चार खासगी दवाखाने, एक दंतचिकित्सक, दोन औषधांची दुकाने तसेच बेकरी आणि किराणा दुकाने असल्याने येथे दिवसभर नागरिकांची आणि रुग्णांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या असमतोल रस्त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून रुग्णांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे.
-----------------
वृद्ध महिलेला दुखापत
स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून रस्ता समतल करावा व सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. तसेच येथील ज्येष्ठ महिला रहिवाशी नसीम शेख या काही दिवसांपूर्वी येथे पडल्या. दुकानातून सामान घेऊन घरी परतत असताना माझा तोल गेला व मी पडले. यामुळे माझा पाय मुरगळला असून उजव्या हाताला इजा झाल्याची माहिती नसीम शेख यांनी दिली. दरम्यान, या संदर्भात पालिकेच्या रस्ते अभियंतांसोबत संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

----------------
याबाबत आम्ही पालिकेच्या ‘पी’ उत्तर विभागात तक्रार केली आहे. तसेच कंत्राटदाराला ही या बाबत सांगितले असून, त्यांनी फक्त आश्वासन दिले. काहीच कारवाई होत नाही. तसेच पावसाळ्यात आमच्या घरात पाणी शिरण्याची भीती आम्हाला वाटत आहे.
- वैशाली पावसकर, ज्येष्ठ महिला नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com