विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन

विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन
Published on

विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन

प्रभादेवी (बातमीदार) : मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर येथे विद्यार्थ्यांसाठी ‘फेमलेस इन्डोर हॉट एअर बलून’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शनिवार (ता. २५) व रविवारी (ता. २६) पार पडणार आहे. ही कार्यशाळा इयत्ता ९ वी व त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी असेल. यात विद्यार्थ्यांना इनडोअर हॉट एअर बलूनचे डिझाइन व निर्मिती याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना विज्ञानातील भूमिती, उर्ध्वप्लवन आणि उष्माविज्ञान यांसारख्या मूलभूत संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून समजावून सांगितल्या जाणार आहेत. या कार्यशाळेला आयआयटी बॉम्बे येथील एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक प्रा. राजकुमार एस. पंत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड वाढविण्यासोबतच संशोधनवृत्ती विकसित करण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले. मुंबईतील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नेहरू सायन्स सेंटरतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com