स्त्रीबीज घोटाळ्यात आठवा आरोपी जेरबंद; खोट्या मेडिकल रिपोर्टचा धक्कादायक पर्दाफाश!

स्त्रीबीज घोटाळ्यात आठवा आरोपी जेरबंद; खोट्या मेडिकल रिपोर्टचा धक्कादायक पर्दाफाश!
Published on

स्त्रीबीजप्रकरणी आठवा आरोपी जेरबंद
खोट्या मेडिकल रिपोर्टचा धक्कादायक पर्दाफाश

बदलापूर, ता. २३ (बातमीदार) ः बदलापुरातील स्त्रीबीज (ओव्हम डोनेशन) प्रकरणाला आणखी वेग मिळाला असून, या प्रकरणातील आठव्या आरोपीला बदलापूर पूर्व पोलिसांनी नूकतीच अटक केली आहे. हरप्रीत सिंग सिद्धू (३५) असे या आरोपीचे नाव असून, तो उल्हासनगर परिसरात मागील दोन वर्षांपासून बेकायदा वैद्यकीय लॅब चालवत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, आरोपी मंजुषा वानखेडे हिच्या सांगण्यावरून आयव्हीएफ सेंटरमध्ये डोनर म्हणून जाणाऱ्या महिलांचे बनावट मेडिकल रिपोर्ट तयार करण्याचे काम हरप्रित करत होता. एखाद्या महिलेच्या आरोग्यात कमतरता असतानाही ती लपवून सर्व तपासण्या व्यवस्थित असल्याचे खोटे दाखवले जात होते. या प्रकारामुळे केवळ डॉक्टरांची फसवणूकच नव्हे, तर अनेक महिलांच्या जीवाशी खेळ करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी सापळा रचून उल्हासनगर येथून हरप्रीत याला अटक केली. बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याच्या गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक राजेश गज्जल यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. अटक झाल्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपी चालवत असलेली बेकायदा लॅब सील करण्यात आली असून, त्याचा सहकारी ‘साळवे’ याचा शोध सुरू आहे. तपासादरम्यान आयव्हीएफ केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनाही बनावट अहवाल दाखवून फसवण्यात आल्याचे उघड झाले आहे. या संपूर्ण रॅकेटमुळे आरोग्य व्यवस्थेवरील विश्वासालाच धक्का बसला असून, या प्रकरणात अजून मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-------------
बनावट वैद्यकीय अहवाल तयार करून केवळ फसवणूकच नव्हे, तर महिलांच्या आरोग्यावर परिणाम करणारा हा प्रकार आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येक घटकाची सखोल चौकशी केली जात आहे. संबंधित सर्व कागदपत्रे, व्यवहार आणि नेटवर्कची तपासणी सुरू असून, पोलिस प्रशासनाकडून आधिक तपास केला जात आहे.
- राजेश गज्जल, पोलिस निरीक्षक, गुन्हे विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com