सिमेंट बल्कर कलंडल्याने मुंबई वाहिनीवर वाहतूक कोंडी

सिमेंट बल्कर कलंडल्याने मुंबई वाहिनीवर वाहतूक कोंडी
Published on

सिमेंट बल्कर कलंडल्याने
पूर्व द्रुतगतीवर वाहतूक कोंडी

ठाणे शहर, ता. २३ (बातमीदार) ः पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी रेल्वे पुलावर सिमेंटचा बल्कर कलंडल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाल्याची घटना आज सकाळी घडली. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पहाटे ५च्या सुमारास बंद पडलेले मिक्सर बाजूला करण्यासाठी १० तासांपेक्षा अधिक वेळ लागला.
ठाणे-मुंबई पूर्व द्रुतगती वाहिनीवर आज सकाळी ५च्या सुमारास ठाण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर कोपरी पुलावर सिमेंट बल्कर कलंडला. या बल्करमध्ये सिमेंट भरलेले होते. कोपरी पुलावर हा मार्ग अरुंद होऊन तीन पदरी होत असल्याने मिक्सरमुळे पुलावरील मार्ग बंद झाला. त्यामुळे काही वेळातच वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. सकाळ ८ वाजेपर्यंत जड-अवजड वाजतूक सुरू असल्याने वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. त्याचा फटका मुंबईला कामावर जाणाऱ्यांना बसला. वाढत्या वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून कोपरी वाहतूक विभागाने विरुद्ध दिशेने एकेरी वाहतूक सुरू करून कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळाने बल्कर बाजूला सरकवून आणखी एक लेन मोकळी करून दिली. मात्र, हा बल्कर पूर्ण बाजूला काढण्यासाठी वाहतूक विभागाला बरेच परिश्रम घ्यावे लागले.
-------------
कोपरी पुलावर रस्ता अरुंद होतो. पुलावर एखादी घटना घडली की येथे वाहतूक कोंडी होते. शिवाय पिकअवर्समध्ये या ठिकाणी वाहनांची गर्दी असल्याने वाहतूक धीमी होते. त्यामुळे हा बल्कर एखाद्या वाहनावर कलंडला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती.
- दिलीप पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com