

भूखंड नोंदींचे तातडीने डिजिटलायझेशन करा
भूखंड फाइल्स गहाळ प्रकरणामुळे नागरिकांमध्ये चिंता, सजग नागरिक मंच आक्रमक
तुर्भे, ता. २३ (बातमीदार) : सिडकोच्या वसाहत विभागातील भूखंड व मालमत्ता नोंदींच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, या सर्व नोंदींचे तातडीने डिजिटलायझेशन करण्याची मागणी ‘सजग नागरिक मंचा’ने केली आहे. मुख्यमंत्री तसेच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन देत या विषयाकडे तातडीने लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या सिडकोच्या अनेक महत्त्वाच्या नोंदी कागदी स्वरूपात असल्याने त्या गहाळ होणे, चोरीला जाणे किंवा छेडछाड होण्याचा धोका वाढला आहे. अलीकडेच सिडको मुख्यालयातून एका महत्त्वाच्या भूखंडाची फाइल गायब झाल्याची घटना समोर आली असून, राज्य माहिती आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतरच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सजग नागरिक मंचाचे सदस्य भीमराव जमखंडीकर यांनी वसाहत विभागातील सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते, एजंट व बिल्डरांना मुक्त प्रवेश दिला जातो, तर सर्वसामान्य नागरिकांवर वेळेची बंधने लादली जातात.
चौकट
तातडीची गरज
भूखंड आणि मालमत्ता नोंदी डिजिटल स्वरूपात उपलब्ध झाल्यास आग, पूर किंवा चोरीसारख्या आपत्तींपासून कागदपत्रांचे संरक्षण होईल. तसेच मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी अधिकृत व सुरक्षित नोंदी उपलब्ध राहतील, ज्यामुळे भविष्यातील वाद आणि न्यायालयीन खटले टाळता येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.