

पालिकेच्या उपक्रमात अस्वच्छतेची बाधा
‘नको असेल ते द्या, हवे असेल ते घ्या’ उपक्रमाठिकाणी घाणीचा विळखा
बेलापूर, ता. २३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेचा ‘नको असेल ते द्या, हवे असेल ते घ्या’ हा स्तुत्य उपक्रम सध्या अस्वच्छतेच्या समस्येत अडकला असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या या दान केंद्रांवर घाणीचे साम्राज्य पसरले असून, टाकून दिलेल्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत.
नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात जुने कपडे व वस्तू दान केल्या जात असल्या तरी त्यांची योग्य छाननी व देखभाल होत नसल्याचे दिसते. अनेक ठिकाणी कचरा, कपडे तसेच गुटखा व सिगारेटच्या पाकिटांचा साठा आढळून येत आहे. संबंधित ठिकाणी कोणतीही देखरेख किंवा कर्मचारी नसल्याने परिस्थिती बिघडत चालली आहे.
या पार्श्वभूमीवर पालिकेने या उपक्रमासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारून स्वच्छता व व्यवस्थापन सुधारावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.