

महापे येथे बांबूंसह शोभिवंत वृक्षांची लागवड
पर्यावरण संवर्धनाचा संदेश
तुर्भे, ता. २३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका आणि काँक्ररटो पेमेंट सिस्टीम यांच्या संयुक्त विद्यमाने महापे येथील उड्डाणपूल परिसरात बांबू तसेच विविध शोभिवंत वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन आणि शहरातील हरित क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या मोहिमेला उद्यान उपायुक्त स्मिता काळे यांचे मार्गदर्शन लाभले. उद्यान अधीक्षक विजय कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वृक्षलागवड ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले. वाढते प्रदूषण आणि तापमानवाढ लक्षात घेता पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थित सर्वांनी ‘वसुंधरेची सामूहिक शपथ’ घेऊन पर्यावरण जतनाचा संकल्प केला. या उपक्रमामुळे परिसरात हरित वातावरण निर्माण होण्यास मदत होणार असून, नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता वाढणार आहे.
याप्रसंगी मुख्य स्वच्छता अधिकारी राजू सिंग चव्हाण, उद्यान सहाय्यक श्रीकांत जाधव, स्वच्छता निरीक्षक तसेच कंपनीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा मोहिमा सातत्याने राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.