खारघरमध्ये अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त मॉक ड्रिल

खारघरमध्ये अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त मॉक ड्रिल
Published on

खारघरमध्ये अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त मॉक ड्रिल
३५० जणांची सुरक्षित सुटका
खारघर, ता. २३ (बातमीदार) : अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त सिडकोच्या खारघर अग्निशमन दलातर्फे डी-मार्ट येथे व्यापक मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली. या सरावादरम्यान ग्राहक आणि कर्मचारी मिळून सुमारे ३५० जणांची शिस्तबद्ध व सुरक्षित सुटका करण्यात आली.
सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेल्या या सरावातून आपत्कालीन परिस्थितीत तत्परता आणि नियोजनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. स्टोअरमधील कर्मचाऱ्यांनी तत्काळ अलार्म देत ग्राहकांना परिस्थितीची माहिती दिली आणि निर्धारित मार्गाने सर्वांना सुरक्षित स्थळी हलवले. संपूर्ण प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्याने आपत्कालीन व्यवस्थापनाची तयारी सक्षम असल्याचे दिसून आले.
डी-मार्टचे स्टोअर मॅनेजर अभय कुमार यांनी सांगितले की, अशा सरावांमुळे कर्मचारी अधिक सजग होतात आणि प्रत्यक्ष संकटाच्या वेळी गोंधळ टाळता येतो. दररोज मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी अशा उपक्रमांचे महत्त्व अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अग्निशमन दलाने प्रतिसाद वेळ, उपकरणांची तयारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता यांची तपासणी या मॉक ड्रिलद्वारे केली. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या ग्राहकांचे आभार मानण्यात आले.

कोट
डी-मार्टमध्ये मॉक ड्रिल यशस्वीपणे पार पडली असून, भविष्यातील आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडली.
- सौरभ पाटील, अग्निशमन अधिकारी, खारघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com