

त्यांच्या सुदृढतेच्या तपासणीचे आदेश
पन्नाशी ओलांडलेल्यांची सरोगेट माता होण्याची याचिका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : वयाची पन्नाशी पार केलेल्या दोन महिलांनी सरोगेट आई होण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने या महिलांच्या शारीरिक सुदृढतेच्या तपासणीचे आदेश दिले.
‘सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञाना’द्वारे (एआरटी) गर्भधारणा करण्यापूर्वी दोन्ही याचिकाकर्त्यांची शारीरिक आरोग्याची तपासणी करण्याचे आदेश न्या. रवींद्र घुगे आणि न्या. हितेन वेणेगावकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिले. या तपासणीत त्या शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्या मागणीचा विचार होईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
आपण गर्भधारणा पूर्ण काळापर्यंत टिकवून ठेवण्यासाठी आणि बाळाला जन्म देण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याचा दावा दोन्ही महिलांनी याचिकेतून केला आहे. याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र एका स्त्रीरोगतज्ज्ञाकडून मिळाल्याचेही याचिकाकर्तींनी याचिकेत म्हटले आहे. न्यायालयानेही त्यांच्या याचिकेची दखल घेऊन वयाच्या या टप्प्यातील महिलांना ‘सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञाना’द्वारे गर्भधारणा शक्य आहे का, असा प्रश्न मागील सुनावणीवेळी उपस्थित केला होता. तसेच, त्याबाबत न्यायालयाला कायदेशीर सहाय्य करण्यासाठी वरिष्ठ वकील आशुतोष कुंभकोणींची न्यायमित्र (अमायकस क्युरी) म्हणून नियुक्ती केली होती. न्यायालयाने याप्रकरणी झालेल्या सुनावणीच्या वेळी कुंभकोणी यांचा सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर याचिकाकर्त्या महिलांना अंतरिम दिलासा दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.