‘वंद्य वंदे मातरम्’ पुस्तकाचे थाटात प्रकाशन

‘वंद्य वंदे मातरम्’ पुस्तकाचे थाटात प्रकाशन
Published on

कल्याण, ता. २३ (बातमीदार) : जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधत अक्षरमंच प्रकाशनतर्फे डॉ. योगेश जोशी लिखित ‘वंद्य वंदे मातरम्’ या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन उत्साहात पार पडले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. गजेंद्र दीक्षित, प्रा. शैलेश रेगे आणि लेखक हेमंत नेहते यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.
७ नोव्हेंबर २०२५ मध्ये ‘वंदे मातरम्’ या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या ऐतिहासिक वारशाची माहिती युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. आतापर्यंत कल्याण-डोंबिवलीसह पुणे, नाशिक, रत्नागिरी आणि गोवा येथील शाळांमध्ये या पुस्तकाच्या ९ हजार प्रतींचे विनामूल्य वितरण करण्यात आले आहे. यावेळी संकल्पनाकार डॉ. योगेश जोशी यांनी महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट जाहीर करत, येत्या ७ नोव्हेंबरपर्यंत या पुस्तकाच्या एकूण २५ हजार प्रती मोफत वितरित करण्याचा संकल्प व्यक्त केला. या पुस्तकात ‘वंदे मातरम्’चे रचनाकार बंकिमचंद्र चटर्जी यांचे जीवनचरित्र, गीताची निर्मिती प्रक्रिया, ‘आनंदमठ’ कादंबरीचा संदर्भ, तसेच या गीताने प्रेरित झालेल्या स्वातंत्र्यलढ्याची माहिती सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत मांडण्यात आली आहे. दरम्यान, शैक्षणिक संस्था, ग्रंथालये किंवा खासगी वर्गांना या पुस्तकाच्या प्रती आवश्यक असल्यास अक्षरमंच प्रकाशनच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com