

तपासातील विरोधाभासामुळे निष्कर्ष निघाला नाही
उच्च न्यायालयाचे ताशेरे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मालेगाव येथे २००६मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी एटीएस आणि एनआयएने दाखल केलेल्या दोषारोपपत्रांमधील परस्परविरोधी भूमिकेमुळे तपास कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचला नाही, असे निरीक्षण गुरुवारी (ता. २३) उच्च न्यायालयाने नोंदवले. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींनाही दोषमुक्त करण्याचा निर्णय न्यायालयाने बुधवारी दिला होता. त्या निकालाची प्रत गुरुवारी उपलब्ध झाली.
एटीएस आणि सीबीआयने सुरुवातीला केलेल्या तपासाकडे आणि गोळा केलेल्या पुराव्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल मुख्य न्या. श्री चंद्रशेखर आणि न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठाने एनआयएवर निकालपत्रात ताशेरे ओढले. तसेच याच कारणास्तव प्रकरण निष्कर्षापर्यंत पोहोचले नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. एटीएस आणि एनआयएच्या आरोपपत्रांमध्ये परस्पर विरोधाभासी कथांमुळे हा तपास कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही. एटीएसने घटनास्थळावरून गुन्ह्याशी संबंधित पुरावे तसेच घटनास्थळावरून आणि नऊ आरोपींपैकी एकाच्या गोदामातून गोळा केलेल्या मातीच्या नमुन्यांमध्ये ‘आरडीएक्स’चे अंश असल्याचे दर्शवणारे न्यायवैद्य पुरावेही उपलब्ध होते, असे न्यायालयाने नमूद केले. हे दोन्ही नमुने एकसारखेच असल्याचे आढळून आले, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे.
...
न्यायालयाची निरीक्षणे
१. आरोपीविरुद्ध खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत की नाही, याची खात्री करण्यासाठी कनिष्ठ न्यायालयाने अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने निरीक्षण नोंदवले.
२. एनआयएने मांडलेल्या कथानकातील अंगभूत विसंगती आणि नैसर्गिक असंभाव्यतेकडे विशेष न्यायालयाने दुर्लक्ष केल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
३. एटीएस आणि सीबीआय यांनी गोळा केलेले पुरावे कनिष्ठ न्यायालय दुर्लक्षित कसे करू शकते, याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही, असेही न्यायालयाने पुढे नमूद केले.
४. सद्यस्थितीत या घटनेच्या दोन परस्पर विरोधाभास समोर असून एटीएस व एनआयए यांनी मांडलेल्या या दोन्ही कथांमध्ये कोणत्याही प्रकारचा मेळ किंवा समन्वय साधता येत नसल्याचेही न्यायालयाने शेवटी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.