मुंबई विद्यापीठातील पेपरफुटीप्रकरणी तिघांना कारणे दाखवा नोटीस

मुंबई विद्यापीठातील पेपरफुटीप्रकरणी तिघांना कारणे दाखवा नोटीस
Published on

तिघांना कारणे दाखवा नोटीस
मुंबई विद्यापीठातील पेपरफुटी प्रकरण

मुंबई, ता. २३ ः दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रातील (सीडीओपी) पेपरफुटी प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई विद्यापीठाने परीक्षा विभागातील तीन कर्मचाऱ्यांना परीक्षा आणि त्यासंदर्भातील गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात प्रवीण कोटियन, विशाल परब, अभिषेक घाडीगावकर यांचा समावेश आहे.
विद्यापीठाच्या सीडीओपीच्या संचालकांनी ही नोटीस बजावली असून येत्या काळात या कर्मचाऱ्यांवर गुन्हेही दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टीवायबीकॉमच्या सेमिस्टर सहा या परीक्षेचे पेपर फुटल्याचे प्रकरण गाजत असून यासाठी विद्यापीठाने आपल्याच कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले आहे. परीक्षा नियंत्रण कक्षात प्रवेश करण्यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता या तिघांनीही प्रवेश करत गोपनीयतेचा भंग केला. यामुळे विद्यापीठाच्या विश्वासार्हतेला बाधा पोहोचल्याने याची विद्यापीठाकडून गंभीर दखल घेण्यात आल्याचे संचालकांनी नोटिशीत म्हटले आहे. तसेच या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ सेवेविषयी त्यांची बेफिकिरी केल्याने त्यांना सेवेतून तत्काळ का कमी करण्यात येऊ नये, असा सवालही या कर्मचाऱ्यांना विचारण्यात आला आहे. या संबंधितांना आपले म्हणणे सात दिवसांत विद्यापीठाकडे लेखी सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.
दरम्यान, युवा सेनेने या प्रकरणात केवळ कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या; मात्र परीक्षेसंदर्भातील मुख्य अधिकारी मोकाटच असल्याने त्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, मयूर पांचाळ आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर आदींनी विद्यापीठाकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com