रोहा-कोलाड मार्गावर अज्ञात वाहनेची धडके लागून तरुणाचा मृत्यू

रोहा-कोलाड मार्गावर अज्ञात वाहनेची धडके लागून तरुणाचा मृत्यू
Published on

रोहा-कोलाड मार्गावर वाहनेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
रोहा, ता. २४ (बातमीदार) ः रोहा-कोलाड मार्गावरील बारसोली गावजवळ एका भरधाव वाहनाच्या धडकेत ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. सोमवारी (ता. २१) ही घटना घडली. या प्रकरणी रोहा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किल्ला गावातील रहिवासी असलेला ज्ञानेश्वर जाधव असे मृताचे नाव आहे. ते बारसोली बसस्थानक परिसरात पायी जात असताना भरधाव वाहनाने त्याला धडक दिली. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तत्काळ रोहा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी ज्ञानेश्वर यांना मृत घोषित केले. या अपघातानंतर संबंधित चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी रोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा अपघात नसून घातपात असल्याच्या चर्चा परिसरात रंगली आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पोलिसांना संपर्क साधले असता या घटनेची चौकशी चालू आहे, असे सांगत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी टाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com