

महालक्ष्मी जत्रेनंतर स्वच्छतेचा जागर
विवळवेढे परिसरात ग्रामपंचायतीची मोहीम
कासा, ता. २४ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील विवळवेढे येथील महालक्ष्मी जत्रोत्सवाची सांगता झाली. या वेळी ग्रामपंचायत प्रशासनाने परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. २ ते १७ एप्रिल या कालावधीत भरलेल्या जत्रेत शेकडो व्यावसायिकांनी दुकाने उभारली होती. जत्रा संपल्यानंतर प्लॅस्टिक, कागद, पाण्याच्या, थंड पेयांच्या बाटल्या तसेच इतर टाकाऊ वस्तूंचा मोठ्या प्रमाणात साठा निर्माण झाला होता. विशेषतः चिकन, मटण विक्रीमुळे कोंबडीची पिसे, उरलेले मांस, कांदे-लसूण, ताडगोळ्यांच्या टरफलांसारखा सेंद्रिय कचरा ठिकठिकाणी साचला होता. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने तातडीने स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात केली. जत्रेदरम्यान वसूल केलेल्या कराचा उपयोग स्वच्छता व सार्वजनिक सुविधांसाठी केला जात असल्याचे या वेळी दिसून आले.
----------------------
वायुप्रदूषणाची समस्या
जत्रेच्या काळात गर्दीमुळे मोठ्या वाहनांना प्रवेश मर्यादित होता; मात्र दुकाने हटवल्यानंतर उपलब्ध झालेल्या मोकळ्या जागांची साफसफाई करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे परिसरात पसरणारी दुर्गंधी एकीकडे कमी झाली आहे. दुसरीकडे काही ठिकाणी कचरा जाळण्यात आल्याने वायुप्रदूषणाची समस्या निर्माण झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.