

कर्जत रेल्वे स्थानकाजवळील बसथांब्याची दुरवस्था
एसी शौचालय बंद, थांब्यावरील पत्र्याच्या शेड गायब
कर्जत, ता. २४ (बातमीदार) : कर्जत शहरातील भिसेगाव येथे रेल्वे स्थानक जवळील बसथांब्याजवळ जुलै २०२५ मध्ये मोठ्या थाटामाटात उद्घाटन पार पडलेले वातानुकूलित (एसी) शौचालय सध्या बंद अवस्थेत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च करून महिलांसाठी उभारलेली ही सुविधा प्रत्यक्षात मात्र वापरात नसल्याने निधी वाया गेला का, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना सावलीसाठी असलेले शेड काढून टाकण्यात आले आहे. परिणामी, एका बाजूला बंद एसी शौचालय आणि दुसऱ्या बाजूला उन्हात उभे असलेले प्रवासी, असे चित्र येथे पाहायला मिळत आहे.
स्थानिकांच्या मते, हा प्रकल्प केवळ कागदोपत्री विकास दाखवण्यासाठी राबवण्यात आला असून, ठेकेदारांना फायदा करून देण्याचा प्रकार आहे. मूलभूत गरजा बाजूला ठेवून अनावश्यक कामांवर भर दिला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
दरम्यान, नगरपरिषद प्रशासन जबाबदारी झटकत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवत असले, तरी प्रवाशांसाठी निवारा शेड, पाणपोई व स्वच्छतागृह उभारणे, ही स्थानिक प्रशासनाचीच जबाबदारी असल्याची चर्चा आहे.
याबाबत उपअभियंता राहुल देवांग यांनी स्थितीची माहिती घेऊन आवश्यक कार्यवाही करू, असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.