

वज्रेश्वरी, ता. २४ (बातमीदार) : दाभाड ग्रामपंचायतीतील कथित पाणीपट्टी गैरव्यवहार प्रकरणात तब्बल आठ वर्षांच्या संघर्षानंतर कारवाई झाली आहे. ग्रामस्वच्छता व पाणीपुरवठा समितीचे तत्कालीन अध्यक्ष दत्तात्रय हरी पाटील आणि तत्कालीन सचिव किशोर विठ्ठल पाटील यांच्या विरोधात अखेर पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०११ ते २०१५ या कालावधीत पाणीपट्टी वसुलीच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. ग्रामस्थांकडून वसूल करण्यात आलेल्या रकमेची योग्य नोंद न ठेवणे, निधीचा अपहार करणे आणि लेखापरीक्षणात विसंगती आढळणे, अशा अनेक बाबी पुढे आल्या होत्या. या प्रकरणाचा पाठपुरावा माहिती अधिकार कार्यकर्ते शांताराम गोविंद पाटील यांनी केला. त्यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून कागदपत्रे मिळवून या कथित भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात कारवाई व्हावी, यासाठी शांताराम पाटील यांनी मागील आठ वर्षांत अभूतपूर्व संघर्ष उभारला. त्यांनी सहा वेळा उपोषण केले, चार वेळा धरणे आंदोलन केले आणि अनेक वेळा प्रशासनाचे दार ठोठावले.
स्थानिक पातळीपासून जिल्हा स्तरापर्यंत पाठपुरावा करत त्यांनी हा मुद्दा जिवंत ठेवला होता. पडघा पोलिस ठाण्यात संबंधित तत्कालीन अध्यक्ष व सचिवांवर गुन्हा नोंदविल्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक व्यवहारांची पारदर्शकता, लेखापरीक्षणाची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांच्या पैशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.