

भाजपा नेते-मंत्र्यांवर गुन्हे दाखल करा
मुंबई, ता. २४ ः भारतीय जनता पक्षाने महिला आरक्षणासाठी वरळी भागात काढलेल्या मोर्चामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. या मोर्चावर टीकेची झोड उठल्यानंतर मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फक्त आयोजकांवर गुन्हा दाखल करून चालणार नाही, तर या मोर्चात सहभागी भाजपचे नेते व मंत्री यांच्यावरही गुन्हे दाखल करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सुरेशचंद्र राजहंस म्हणाले की, मोर्चा काढायचा असेल वा आंदोलन करायचे असेल, तर पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. आठ आठ दिवस आधी पत्र पाठवूनही पोलिस विरोधी पक्षांच्या आंदोलनाला लवकर परवानगी देत नाहीत. परवानगी दिली, तर अनेक अटी व शर्ती घातल्या जातात, पण भाजपच्या या मोर्चाला दोन दिवसांतच परवानगी दिल्याची माहिती मिळत आहे. सत्ताधारी पक्षांना नियम वेगळे व विरोधी पक्षांना वेगळे अशी पद्धत पोलिस प्रशासनात रूढ होत चालली आहे, हे अत्यंत घातक आहे.
काँग्रेस पक्षाने याआधी जेव्हा आंदोलने केली, त्या वेळी आयोजक व सहभागी नेत्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मग वरळीच्या मोर्चाप्रकरणी फक्त आयोजकावरच गुन्हे का? सहभागी मंत्र्यांवर, आमदारांवर गुन्हे का दाखल करत नाही? पोलिसांनी कायद्याने काम करावे, राजकारण करू नये, असेही सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.