पनवेलमध्ये ‘पॉड टॅक्सी’चा प्रस्ताव

पनवेलमध्ये ‘पॉड टॅक्सी’चा प्रस्ताव
Published on

पनवेलमध्ये ‘पॉड टॅक्सी’चा प्रस्ताव
पनवेलकरांचा प्रवास होणार हायटेक ः राज्य सरकारचे सकारात्मक संकेत
पनवेल, ता. २४ (बातमीदार) ः पनवेल महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे उद्भवणारी वाहतूक कोंडी यावर मात करण्यासाठी आता आधुनिक ‘पॉड टॅक्सी’ सेवेचा पर्याय समोर आला आहे. मुंबई महानगर प्रदेशाच्या धर्तीवर पनवेलमध्येही ही सेवा सुरू करावी, असा प्रस्ताव शिवसेनेच्या नगरसेविका सायली सरक यांनी मांडला असून, याला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल आणि पनवेल या परिसरात वाढत्या वाहनसंख्येमुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तसेच, वायुप्रदूषणही चिंतेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर, वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी पॉड टॅक्सी हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो, असे मत सायली सरक यांनी व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशातील रहिवाशांसाठी सरकारकडून विविध वाहतूक प्रकल्प राबवले जात असून, पॉड टॅक्सी सेवा त्यातील महत्त्वाचा घटक ठरत आहे. मुंबईतील कुर्ला ते बीकेसी यादरम्यान या प्रकल्पाची सुरुवात झाली असून, आता ठाणे, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर या शहरांमध्येही ही सेवा विस्तारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पालिकेकडून सर्वेक्षणाचे संकेत
पनवेलमध्येही पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी सायली सरक यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन दिले. या प्रस्तावाबाबत मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. तसेच महापौर नितीन पाटील आणि आयुक्त मंगेश चितळे यांनाही यासंदर्भात निवेदन सादर केले आहे. पालिकेकडून लवकरच सविस्तर सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यानंतर या प्रकल्पाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com