मनसे पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

मनसे पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला
Published on

उल्हासनगर (वार्ताहर) : पोलिस तक्रारीचा बदला घेण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यावर लोखंडी सळीने प्राणघातक हल्ला झाल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगरात मनसे पदाधिकारी मैनुद्दीन शेख (४६) यांच्यावर लोखंडी रॉड आणि चिली स्प्रेचा वापर करून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी (ता. २२) सायंकाळच्या सुमारास शेख हे भाचा फिरोजसोबत परतत असताना पवन गुप्ता आणि त्याच्या साथीदाराने अचानक त्यांना अडवले. संशयितांनी धमकी देत शेख यांच्यावर रॉडने डोक्यावर आघात करीत बेदम मारहाण केली. त्यानंतर चिली स्प्रे फवारून दोघांना असहाय्य करीत छाती, हात व पायांवर अमानुष मारहाण करण्यात आली. या हल्ल्यामागे जुना वाद व पोलिस तक्रारीचा राग कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. जखमी शेख यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, मुख्य संशयित आरोपी अद्याप फरार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, तातडीने आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com