स्टंटबाजीला पोलिसांचा दणका

स्टंटबाजीला पोलिसांचा दणका
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : मुंब्रा-कौसा परिसरात चार जणांनी एका दुचाकीवर बसून भरधाव व बेदरकारपणे दुचाकी चालवत केलेली स्टंटबाजी एका व्हायरल व्हिडिओमुळे वाहनचालक आणि मालकाच्या चांगलीच अंगाशी आली आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी तातडीने कारवाई करीत संबंधित दुकलीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस शिपाई संदीप शंकर शेंडगे (३०) यांच्या तक्रारीनुसार, सोमवारी (ता. २०) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कौसा परिसरात खर्डी रोड ते वाय जंक्शनदरम्यान पेट्रोलिंग करीत होते. त्या वेळी तन्वरनगर नाका येथे चार जण एकाच मोटारसायकलवरून भरधाव, धोकादायक पद्धतीने प्रवास करीत आहेत, अशी एका जागरूक नागरिकाने माहिती दिली. त्यानुसार तत्काळ शोधमोहीम हाती घेतली. सुरुवातीला संबंधित वाहन सापडले नाही; मात्र समाजमाध्यमावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाचे आदेश दिले. त्यानुसार माहितीच्या आधारे बीट पथकाने दर्गा रोड परिसरात शोध घेऊन तीन जणांना ताब्यात घेतले.

मोटारसायकल चालवणारा १६ वर्षांचा असून, त्याच्याकडे वैध परवाना नव्हता. त्याच्यासोबत अन्य दोघेही अल्पवयीन आणि शमीन समीर मोमीन (२०) हे तिघे मागे बसले होते. चौघांनीही धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्याची कबुली दिली. एका अल्पवयीन मुलाचे वडील हुसेन सलीम शेख यांनी एका महिलेकडून १५ हजारांना दुचाकी विकत घेतली होती; मात्र वाहनाची कागदपत्रे अद्याप त्यांच्या नावावर हस्तांतरित केली नव्हती. तसेच त्यांनी ही दुचाकी मुलाकडे वापरण्यास दिली होती. या प्रकरणी हुसेन सलीम शेख आणि दुचाकीचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com