

तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
रोहा (बातमीदार) : एमओसी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर पनवेल आणि जाधव नर्सिंग होम रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रोहा मेडिकल फाउंडेशन यांच्या सौजन्याने गुरुवारी (ता. २३) मोफत मेमोग्राफी आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रोहे शहरात डॉ. अशोक जाधव हे गेली अनेक वर्षांपासून सातत्याने या शिबिराचे आयोजन करत आहेत. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. जाधव नर्सिंग होमचे प्रमुख डॉ. अशोक जाधव (एमडी मेडिसीन) डॉ. संदेश शिंदे, डॉ. अनामिका लोहार, डॉ. सर्जिल करजीकर, डॉ. रुकय्या अन्सारी, एमओसी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर स्टाफ, नितीन पटेल, सतीश पारेकर, ऋतूषा बामणे, शगुफ्ता खान आदी जणांनी अफाट मेहनत घेतली. स्क्रीनिंग मेमोग्राफी ही एक विशिष्ट प्रकारची ब्रेस्ट इमेजिंग आहे. जी कमी डोसच्या एक्स-रेचा वापर करून कर्करोग लवकर ओळखते. स्तनाच्या कर्करोगाची तपासणी करण्यासाठी दरवर्षी मेमोग्राफी तपासणी करणे गरजेचे आहे, असा सल्ला डॉ. अशोक जाधव यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.