‘निपुण महाराष्ट्र’मध्ये रायगड जिल्ह्याची उल्लेखनिय प्रगती

‘निपुण महाराष्ट्र’मध्ये रायगड जिल्ह्याची उल्लेखनिय प्रगती
Published on

‘निपुण महाराष्ट्र’मध्ये जिल्ह्याची उल्लेखनीय प्रगती
१६७ शाळा राज्य स्तरावर ‘निपुण सुपर स्कूल’ म्हणून घोषित
अलिबाग, ता. २४ (वार्ताहर) ः राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘निपुण महाराष्ट्र’ अभियानात रायगड जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती केली आहे. जिल्ह्यातील १६७ शाळांनी ८० ते १०० टक्के अध्ययन क्षमता प्राप्त केल्याने त्यांना राज्य स्तरावर ‘निपुण सुपर स्कूल’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत विद्यार्थ्यांच्या प्रगतीत झालेली ही वाढ जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी भूषणावह ठरली आहे.
शासनामार्फत ‘निपुण महाराष्ट्र’ सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता (वाचन व लेखन) आणि संख्याज्ञान कौशल्य (संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया) यांच्या विकास व्हावा हा उद्देश आहे. याकरिता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले यांच्या संकल्पनेमधून प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या ‘लर्निंग इंप्रूवमेंट प्रोग्राम’ व ओपन लिंक्स फाउंडेशन (विनोबा ॲप) हे उपक्रम राबवण्यात आले. यांचेमार्फत जिल्ह्यातील इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन, संख्याज्ञान व संख्यावरील क्रियाविषयक विविध पायाभूत, शिष्यवृत्ती व अंतिम मूल्यमापन चाचण्यांद्वारे नियमित सराव घेण्यात आले.
यामुळे शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील १६७ शाळा राज्य स्तरावर निपुण सुपर स्कूल म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. निपुण महाराष्ट्र अभियानाच्या प्रगतीकरीता व पुढील वाटचालीकरीता रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील व अर्थ व शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मोलाचा सहभाग
‘निपुण महाराष्ट्र’ उपक्रमात राजिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व सर्व शिक्षकांचा मोलाचा सहभाग आहे. सर्वोत्तम स्तर (८० ते १०० टक्के) प्राप्त विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी यापुढेही अशाच प्रकारचे उपक्रम राबविणार असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले यांनी सांगितले.

सर्वाेत्तम स्तर प्राप्त विद्यार्थीसंख्या
परीक्षा डिसेंबर २०२५ मार्च २०२६
वाचन २१,३६२ ३४,२६७
लेखन १७,५११ ३२,३५९
संख्याज्ञान ३५,१७८ ४९,७४५
संख्यावरील क्रिया २७,३८३ ४२,९८९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com