कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी पाणीपुरवठा बंद

कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी पाणीपुरवठा बंद
Published on

कल्याण (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत बारावे, मोहिली, नेतिवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांवरील विद्युत व यांत्रिकी उपकरणांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे मंगळवारी (ता. २८) सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत १२ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. या कालावधीत कल्याण पूर्व व पश्चिम, डोंबिवली पूर्व व पश्चिम, तसेच कल्याण ग्रामीण भागातील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि इतर परिसरांमध्ये पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करून ठेवावा, तसेच पाण्याचा जपून वापर करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com