

दरीत काेसळून दाम्पत्याचा मृत्यू
पाेलादपूरजवळ आंबेनळी घाटात थरारक शाेधमाेहीम
पोलादपूर, ता. २४ (बातमीदार) : आंबेनळी घाटामध्ये झालेल्या विचित्र अपघातात ५०० फूट खाेल दरीत काेसळून दुचाकीस्वार दाम्पत्याचा मृत्यू झाला. मोहन चव्हाण (वय ५५) आणि जयश्री चव्हाण (४८, रा. सोनगिरवाडी) अशी मृतांची नावे आहेत. सुमारे दाेन टप्प्यांत चाललेल्या बचावकार्यानंतर दाेघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गावाजवळ गुरुवारी (ता. २३) सायंकाळी ७ च्या सुमारास प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य अमित जाधव यांनी घाटातील एका धोकादायक वळणावर रस्त्याच्या कठड्याला अडकलेली दुचाकी दिसली. त्यांनी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन सहकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दाेरखंडाच्या सहाय्याने दरीत उतरून शाेध सुरू केला. परिसरात झालेला पाऊस आणि धुके, निसरडा उतार यामुळे या माेहिमेत प्रचंड अडचणी येत हाेत्या. मध्यरात्रीनंतर १ वाजताच्या सुमारास पुरुषाचा मृतदेह सापडला. त्यानंतर प्रतिकूल परिस्थितीमुळे शाेधमाेहीम थांबवण्यात आली. शुक्रवारी सकाळी ९ वाजता पुन्हा शाेध सुरू करण्यात आला. तब्बल तीन तासांनंतर महिलेचा मृतदेहही दरीतून बाहेर काढण्यात आला. या वेळी पोलादपूर व महाबळेश्वर पोलिस घटनास्थळी उपस्थित हाेते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.