यूपीच्या कारागृहात बसून भाजपा नगरसेवक संतोष शेट्टी यांच्याकडे खंडणी मागण्याचा कट

यूपीच्या कारागृहात बसून भाजपा नगरसेवक संतोष शेट्टी यांच्याकडे खंडणी मागण्याचा कट
Published on

कारागृहातून खंडणीचा कट
आरोपीस १० वर्षांची शिक्षा

भिवंडी, ता. २४ (वार्ताहर) : उत्तर प्रदेशातील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच भिवंडीतील भाजपा नगरसेवक तथा गटनेते संतोष शेट्टी यांच्याकडे खंडणी मागण्याचा कट रचणाऱ्या छोटा राजन टोळीशी संबंधित आरोपीस भिवंडी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
आझाद मासुक अली अन्सारी ऊर्फ इजू बाटला ऊर्फ नन्हे (४४) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला चार हजार रुपयांचा दंडही ठोठावला असून, दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५मध्ये उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील जॉर्ज टाऊन पोलिसांनी इंद्रेशकुमार गुलाब सिंह आणि मोहम्मद सलीम ऊर्फ शेख मोहम्मद हनीफ या दोघांना शस्त्रांसह ताब्यात घेतले होते. चौकशीत भिवंडीतील नसरुल्ला ऊर्फ बाहत्तर नूर मोहम्मद अन्सारी याच्या माध्यमातून कारागृहात असलेल्या आझाद अन्सारीने संतोष शेट्टी यांच्याकडून २५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा कट रचल्याचे उघड झाले. तसेच संतोष शेट्टी यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्याची तयारी सुरू असल्याची माहितीही तपासात समोर आली होती. या प्रकरणाची माहिती वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्यानंतर संतोष शेट्टी यांनी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर भिवंडी गुन्हे शाखेने तपास सुरू करून तिघांना अटक केली होती.

भिवंडी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. एम. काळे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. तपासी अधिकारी तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र डोईफोडे, पैरवी अधिकारी अभिमन्यू पाटोळे यांनी सरकारी वकील व्ही. एम. मुंढे यांच्या माध्यमातून पुरावे सादर केले. पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी आझाद अन्सारी याला दोषी ठरवत १० वर्षांच्या सक्तमजुरी कारावासाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्यातील अन्य तिघांविरोधातील खटला अद्याप न्यायप्रविष्ट असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com