मेट्रो - ५ च्या विस्तारित मार्गिकेसाठी १८ हजार १३० कोटींच्या निधीला मंजूरी

मेट्रो - ५ च्या विस्तारित मार्गिकेसाठी १८ हजार १३० कोटींच्या निधीला मंजूरी
Published on

कल्याण ते उल्हासनगर मेट्रोचा मार्ग मोकळा
मेट्रो-५ विस्तारित मार्गिकेसाठी १८,१३० कोटींच्या निधीस मंजुरी

कल्याण, ता. २४ (वार्ताहर) : मेट्रो-५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) प्रकल्पाच्या विस्तारित मार्गिकेसाठी १८ हजार १३० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली असून, कल्याण ते उल्हासनगरपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली व उल्हासनगर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विस्तारित मार्गिकेनुसार मेट्रो-५ ही धामणकर नाका ते दुर्गाडी तसेच कल्याण रेल्वे स्थानकापासून खडकपाडामार्गे उल्हासनगरपर्यंत धावणार आहे. त्यामुळे उल्हासनगर व कल्याण परिसरातील प्रवाशांना थेट ठाण्याशी जलद संपर्क साधता येणार आहे. या प्रकल्पासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने या मार्गिकेच्या विस्ताराला गती मिळाली आहे. याबद्दल खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
मार्गिकेची एकूण लांबी ३४.२१ किलोमीटर असून, या विस्तारित मार्गिकेमध्ये १९ स्थानकांचा समावेश आहे. प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कापूरबावडी ते धामणकर नाका, तर दुसऱ्या टप्प्यात धामणकर नाका ते दुर्गाडी असा मार्ग असेल. पुढे मार्गिका ५अ अंतर्गत दुर्गाडी-कल्याण-उल्हासनगर असा विस्तार करण्यात येणार आहे. यापुढे उल्हासनगर ते अंबरनाथ-बदलापूरपर्यंतही मेट्रो विस्ताराचा मार्ग मोकळा होणार असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकल्पामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर परिसरातील सुमारे ६९ लाख नागरिकांना फायदा होणार आहे.
----------
प्रवासाच्या वेळेत बचत
सध्याच्या तुलनेत प्रवासाच्या वेळेत ४० ते ५० टक्क्यांपर्यंत बचत होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र शासन व संबंधित विभागांच्या मंजुरी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाच्या पुढील कामांना वेग येणार आहे. या विस्तारामुळे ठाणे जिल्ह्यातील उपनगरांमधील कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळणार असून, भविष्यातील नागरी विकासालाही गती मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com