तुटलेल्या पाणी व्हॉल्वच्या झाकणावर महापौरांचा संताप

तुटलेल्या पाणी व्हॉल्वच्या झाकणावर महापौरांचा संताप
Published on

कल्याण, ता. २४ (वार्ताहर) : कल्याण पश्चिम परिसराच्या पाहणीदरम्यान महापौर हर्षाली चौधरी यांनी रस्त्यावर असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या व्हॉल्वच्या झाकणाच्या खराब अवस्थेबाबत कडक भूमिका घेतली. प्रेम ऑटोजवळील रस्त्यावर हे झाकण तुटलेले आढळले, ज्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. ही स्थिती पाहताच महापौर ॲक्शन मोडमध्ये दिसल्या आणि ते तत्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांना महापौरांनी चांगलेच फटकारले.

हे ठिकाण स्मशानभूमीजवळ असल्याने नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. त्यामुळे तुटलेल्या झाकणामुळे कधीही गंभीर अपघात होऊ शकतो, अशा शब्दांत महापौरांनी फटकारत विचारले की, एवढी खराब अवस्था असतानाही वेळेवर दुरुस्ती का करण्यात आली नाही. तसेच, कामात कोणतीही हलगर्जी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. स्थानिक नागरिकांनीही आपल्या समस्या महापौरांसमोर मांडल्या आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. महापौरांनी नागरिकांना आश्वासन दिले की, ही समस्या त्वरित सोडवली जाईल आणि शहरातील रस्ते व संबंधित सुविधा प्राधान्याने दुरुस्त करण्यात येतील, जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल आणि वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com