

नवी मुंबईत डेब्रिज व्यवस्थापनाची मागणी
अनधिकृत डम्पिंग रोखण्यासाठी एकात्मिक प्रणालीची गरज
तुर्भे, ता. २४ (बातमीदार) : नवी मुंबईत वाढत्या अनधिकृत डेब्रिज डम्पिंगमुळे पर्यावरण आणि नागरी सुविधांवर गंभीर परिणाम होत असून, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून ‘एकात्मिक डेब्रिज व्यवस्थापन प्रणाली’ उभारण्याची मागणी सजग नागरिक मंचाने शासनाकडे केली आहे.
सिडको, नवी मुंबई महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून कारवाई होत असली तरी अधिकृत डम्पिंगच्या पर्यायांचा अभाव असल्याने ही कारवाई अपुरी ठरत असल्याचे मंचाने नमूद केले. शहरातील मोकळे भूखंड, नाले, खारफुटी क्षेत्रे आणि डोंगरपायथ्यांवर मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकले जात असून, त्यामुळे नाले तुंबणे, पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होणे आणि पर्यावरणीय संतुलन बिघडणे यासारख्या समस्या वाढत आहेत.
मंचाने अधिकृत डम्पिंग साइट्स जाहीर करणे, संयुक्त धोरण तयार करणे, ऑनलाइन नोंदणी व डिजिटल पास प्रणाली सुरू करणे, तसेच डेब्रिज पुनर्वापरासाठी रीसायकलिंग प्लांट उभारण्याची मागणी केली आहे. याशिवाय नागरिकांसाठी ‘डेब्रिज ऑन कॉल’ सेवा सुरू करण्याचीही गरज व्यक्त करण्यात आली आहे.
नियोजित शहर असलेल्या नवी मुंबईत पारदर्शक आणि शाश्वत डेब्रिज व्यवस्थापन प्रणाली उभारणे अत्यावश्यक असल्याचे मंचाने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.