

पीएनजी गॅस पाईपलाईन कनेक्शनसाठी नोंदणी शिबिर
पालिका आणि महानगर गॅस यांच्यातर्फे उपक्रम
पनवेल, ता.२४ (बातमीदार): केंद्र शासनाच्या नैसर्गिक गॅस पुरवठा वाढविण्यावर भर दिला आहे. पनवेल महापालिका आणि महानगर गॅस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पीएनजी (पाईपद्वारे नैसर्गिक वायू) गॅस पाईपलाईन कनेक्शनसाठी विशेष नोंदणी शिबिर घेण्यात येणार आहे. हे शिबिर उद्या, रविवारी (ता.२६) लोकनेते दि.बा. पाटील शाळेमध्ये ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन पीएनजी गॅस कनेक्शनसाठी नोंदणी करावी, असे आवाहन महापालिकेच्यावतीने आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या सूचनेनूसार एलपीजीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने, ज्या भागात गॅस पाईपलाईन उपलब्ध आहे त्या भागातील नागरिकांनी पीएनजी गॅसचा अधिकाधिक वापरास जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर वाढविण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त नागरिकांनी महानगर गॅसचे कनेक्शन घेणे गरजेचे आहे.
चौकट
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
रहिवासी पुरावा (कोणताही एक)
वीज बिल
इंडेक्स-२ ची प्रत
पासपोर्ट साईज फोटो
ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र / वाहन परवाना)
ई-मेल आयडी
सक्रिय मोबाईल नंबर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.