

कल्याण (बातमीदार) : जागतिक पुस्तक दिनानिमित्त कल्याण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने प्रबोधनकार ठाकरे सरोवर परिसरात ‘एक कविता तळ्याकाठी’ आणि ‘पुस्तक प्रदर्शन’ या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वाचन संस्कृतीचा प्रचार करण्याच्या उद्देशाने विविध प्रकारचे ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले होते, तर ‘तात्काळ सभासद’ योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. तळ्याकाठच्या शांत वातावरणात कवींनी स्वरचित कविता सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. या काव्यमैफलीत सिने-नाट्य क्षेत्रातील कलाकारांसह स्थानिक कवींनी सहभाग घेतला. सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. पुस्तकगुढी उभारून करण्यात आलेले उद्घाटनही आकर्षण ठरले. निसर्गाच्या सानिध्यात पुस्तके आणि कवितांचा सुंदर संगम घडवत हा उपक्रम कल्याणकरांसाठी संस्मरणीय ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.