

पतीकडून पत्नीचा
गळा आवळून खून
ठाणे, ता. २४ : शहरातील नौपाडा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पती नरेश कमलसिंग खडका (३२) याने कौटुंबिक वादातून त्याची पत्नी हिमा खडका हिचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार नौपाडा, टेकडी बंगला येथे शुक्रवारी (ता. २४) दुपारी समोर आला. नौपाडा पोलिसांनी फरार नरेश याला पनवेल येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तक्रारदार विजय पगारे (३८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.