

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा गौरव
‘एअरपोर्ट एक्स्पो ३६०’मध्ये तीन मानाचे पुरस्कार
नवी मुंबई, ता. २४ : विमान वाहतूक क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘एअरपोर्ट एक्स्पो ३६०-२०२६’ या प्रदर्शनात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या दोनदिवसीय सोहळ्यात नवी मुंबई विमानतळाला तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामुळे भारतीय विमानतळ क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
‘एअरपोर्ट एक्स्पो ३६०’ गुरुवारी (ता. २३) आणि शुक्रवारी (ता. २४) पार पडलेल्या या जागतिक स्तरावरील कार्यक्रमात नवी मुंबई विमानतळाला पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. इमर्जिंग एअरपोर्ट ऑफ द इयर २०२६, आऊटस्टँडिंग टर्मिनल टेक्नॉलॉजी अवॉर्ड २०२६, पार्टनरशिप एक्सलन्स अवॉर्ड २०२६ या तीन पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या वेळी विमानतळ चालक, विमान वाहतूक तज्ज्ञ आणि पायाभूत सुविधा भागीदार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या परिषदेत विमानतळ विकासाच्या भविष्यावर सखोल चर्चा करण्यात आली. तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट नियोजन आणि परस्पर सहकार्यातून प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि विनाअडथळा कसा करता येईल, यावर या कार्यक्रमात भर देण्यात आला.
जागतिक दर्जाच्या सुविधांचे उद्दिष्ट
मिळालेले हे तिन्ही पुरस्कार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दूरदृष्टीची पावती मानले जात आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट डिझाइनच्या जोरावर प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी एनएमआयए कटिबद्ध आहे. विशेषतः टर्मिनल तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्ण प्रयोग आणि एईकॉम (एईसीओएम) सोबतची त्यांची भागीदारी उद्योगासाठी नवीन मापदंड प्रस्थापित करणारी ठरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.