

जोशी रुग्णालयातील कर्मचाऱ्याला
लाच घेताना अटक
भाईंदर, ता. २४ (बातमीदार) : अमरनाथ यात्रेसाठी आवश्यक असलेले आरोग्य प्रमाणपत्र कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता देण्यासाठी लाच मागणाऱ्या भाईंदर येथील भीमसेन जोशी रुग्णालयातील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. आरोपीला ३,६०० रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी ताब्यात घेण्यात आले.
अमरनाथ यात्रेसाठी भाविकांना आरोग्यदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असते. तक्रारदार व त्यांचे सहकारी हे प्रमाणपत्र घेण्यासाठी जोशी रुग्णालयात गेले होते. त्या वेळी रुग्णालयातील कर्मचारी अमित किणी याने डॉक्टरांना भेटण्याची अथवा कोणतीही तपासणी करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत प्रत्येकी ५०० रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
तडजोडीनंतर प्रत्येकी ४०० रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर विभागाने सापळा रचला.
शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी अमित किणी याला नऊ प्रमाणपत्रांसाठी एकूण ३,६०० रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे रुग्णालय परिसरात खळबळ उडाली असून, वैद्यकीय प्रमाणपत्र प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.