अटल सेतूवर अज्ञात वाहनाच्या धडकेत डंपर चालकाचा मृत्यू

अटल सेतूवर अज्ञात वाहनाच्या धडकेत डंपर चालकाचा मृत्यू
Published on

वाहनाच्या धडकेत
डम्परचालकाचा मृत्यू

नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : डम्परचे टायर (स्टेपनी) बदलणाऱ्या एका ४६ वर्षीय चालकाला अज्ञात वाहनाने धडक
दिल्याची घटना ‘अटल सेतू’वर गुरुवारी (ता. २३) दुपारी घडली. या अपघातात डम्परचालकाचा मृत्यू झाला. उलवे पोलिसांनी या अपघातातील पळून गेलेल्या वाहनचालकाचा शोध सुरू केला आहे.
मोहम्मद नसीम जमील अहमद खान (४६) असे या अपघातात मृत झालेल्या चालकाचे नाव असून, तो चेंबूर येथे राहण्यास होता. तसेच तो डम्परवर चालक म्हणून काम करीत होता. मोहम्मद नसीम हा गुरुवारी (ता. २३) दुपारी २.३०च्या सुमारास आपला डम्पर घेऊन अटल सेतूवरून उलवेच्या दिशेने जात होता. या वेळी डम्परचा टायर पंक्चर झाल्याने त्याने अटल सेतूवरील तिसऱ्या लेनमध्ये डम्पर उभा केला. त्यानंतर तो स्टेपनी बदलण्यासाठी खाली उतरला. याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने मोहम्मद नसीम याला जोरदार धडक दिली. या वेळी मोहम्मद नसीम याच्यासोबत असलेल्या करण यादव (३८) याने तातडीने रुग्णवाहिका बोलावून मोहम्मद नसीम याला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com