

५०० स्क्वेअर फूट घराचा दावा खोटा
झोपडपट्टीवासीयांची दिशाभूल सुरू ः विजय चौगुले
तुर्भे, ता. २५ (बातमीदार) : भाजपचे माजी महापौर सुधाकर सोनवणे आणि स्वीकृत नगरसेवक अमित मेढकर यांनी झोपडपट्टीवासीयांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप शिवसेना उपनेते तथा नवी मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी केला आहे. शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून नवी मुंबईतील झोपडपट्टीधारकांना ५०० स्क्वेअर फुटांचे घर मिळणार असल्याचे सांगितले जात असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार, १ जानेवारी २०११ किंवा त्यापूर्वी सरकारी जमिनीवर झालेली निवासी अतिक्रमणे काही अटी व शर्तींच्या अधीन राहून नियमित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयात ५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी अतिक्रमणांचे मोफत नियमितीकरण, तर ५०० ते १,५०० चौरस फुटांपर्यंतच्या क्षेत्रासाठी रेडीरेकनर दराच्या १० टक्के शुल्काने नियमितीकरण करण्याचा उल्लेख आहे. मात्र हा निर्णय केवळ निवासी कारणासाठी झालेल्या अतिक्रमणांनाच लागू असून नदीपात्र, नाले, रस्ते, वने, शाळा, रुग्णालये, आरक्षित जागा किंवा इतर सार्वजनिक उपयोगाच्या सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे नियमित होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. चौगुले यांनी सांगितले, की शासन निर्णयात नव्याने घरे देण्याचा कोणताही उल्लेख नसून केवळ अतिक्रमणे नियमित करण्याची प्रक्रिया नमूद आहे. त्यामुळे घर मिळणार असा दावा करून झोपडपट्टीवासीयांमध्ये खोटी अपेक्षा निर्माण केली जात आहे. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही दाव्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी शासनाचा अधिकृत निर्णय तपासून पाहावा आणि वस्तुस्थिती समजून घ्यावी, असे आवाहन शिवसेनेकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.