बदलापूर स्थानकात संतापाचा उद्रेक; पादचारी पुलावर बागेश्वर बाबा चा फोटो पायांनी तुडवला!

बदलापूर स्थानकात संतापाचा उद्रेक; पादचारी पुलावर बागेश्वर बाबा चा फोटो पायांनी तुडवला!
Published on

बदलापूर स्थानकात संतापाचा उद्रेक
पादचारी पुलावर बागेश्वर बाबाचा फोटो पायांनी तुडवला!

बदलापूर, ता. २५ (बातमीदार) ः छत्रपती शिवाजी महाराजांबाबत करण्यात आलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर बदलापूर शहरात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक भूमिकेत उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. बदलापूर रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाच्या पायऱ्यांवर बागेश्वर बाबाचे फोटो लावून पायदळी तुडवण्याचे आंदोलन करण्यात आले. प्रवाशांची मोठी वर्दळ असलेल्या या ठिकाणी झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी अविनाश देशमुख यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यांनी स्वतः पुढाकार घेत पायऱ्यांवर लावलेले फोटो पायदळी तुडवत निषेध दर्शवला. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध अधिक तीव्र केला. विशेष म्हणजे, येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांनीही या फोटोंवरून चालत निषेधात सहभागी व्हावे, या उद्देशाने हे फोटो मुद्दाम पायऱ्यांवर लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद वक्तव्य सहन केले जाणार नाही, असा इशारा या वेळी देण्यात आला. संबंधित व्यक्तीकडून तत्काळ माफी मागण्यात यावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशाराही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. भविष्यात अशा प्रकारच्या वादग्रस्त विधानांना आळा घालण्यासाठी प्रशासनानेही कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. या घटनेमुळे बदलापूर शहरात राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, विविध संघटना आणि शिवप्रेमींकडूनही संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com