महिलेच्या मोबाईलवर अश्लील गैरवर्तन हवालदार प्रकाश कोकरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते निलंबित

महिलेच्या मोबाईलवर अश्लील गैरवर्तन हवालदार प्रकाश कोकरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते निलंबित
Published on

महिलेच्या मोबाईलवर अश्लील गैरवर्तन
दोन पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

पेण, ता. २५ (वार्ताहर) : पेण पोलिस ठाण्यातील हवालदार प्रकाश कोकरे आणि खोपोली पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मोहिते यांच्यावर एका महिलेच्या मोबाईलवर अश्लील गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे रायगड पोलिसदलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पेण येथील महिला दक्षता समितीच्या सदस्यांच्या मोबाईल व्हॉट्सॲपवर कोणतेही शासकीय काम नसताना दोन्ही अधिकाऱ्यांनी गैरजबाबदारीने संपर्क साधत अश्लील स्वरूपाचे गैरवर्तन केल्याची तक्रार करण्यात आली होती. मंगळवारी (ता. २१) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हवालदार प्रकाश कोकरे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मोहिते यांनी एकत्र मद्यपान केल्यानंतर संबंधित महिलेच्या मोबाईलवर वारंवार कॉल करून अश्लील स्वरूपाचे संभाषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने रायगड पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षकांनी दोन्ही अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com