

हुकूमशाही कारभाराला चपराक
घटनादुरुस्ती विधेयकावरून श्रीरंग बरगे यांची टीका
पालघर, ता. २६ (बातमीदार) ः लोकसभेने नाकारलेल्या १३१व्या घटनादुरुस्तीनंतर हुकूमशाही कारभाराला चपराक बसली आहे. म्हणूनच भाजपचे आकांडतांडव सुरू असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
महिला आरक्षणात डिलिमिटेशन, जनगणनेची घुसखोरीऐवजी सध्याच्या जागांपैकी ३३ टक्के जागा राखीव ठेवा, अशी मागणीही बरगे यांनी या वेळी केली. पालघर येथील काँग्रेस भवनातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८५० करून भाजपने षड्यंत्र रचले होते; मात्र विरोधी पक्षांनी हा डाव उधळून लावल्याची टीका बरगे यांनी केली.
--------------------
प्रगत राज्यांविरोधात षड्यंत्र
मोदी सरकारला लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८५० करायच्या होत्या. महाराष्ट्र, दक्षिण भारतातील ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण केले. त्यांच्या जागा कमी प्रमाणात वाढणार, उत्तर भारतातील जागा मोठ्या प्रमाणात वाढणार होत्या. प्रगत राज्यांना राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्याचा हा डाव होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.