पळसाच्या पत्रावली ग्रामीण भागातून हद्दपार

पळसाच्या पत्रावली ग्रामीण भागातून हद्दपार
Published on

जेवणावळीतून पत्रावळी हद्दपार
ग्रामीण भागातील लग्नसमारंभात प्लॅस्टिकचा वापर
विक्रमगड, ता. २६ (बातमीदार)ः तालुक्यातील रानावनात पळसाची झाडे मोठ्या प्रमाणावर दिसतात, पण कधीकाळी ग्रामीण भागातील लग्नसमारंभ, धार्मिक विधींचा घटक असलेल्या पळसाच्या पानांच्या पत्रावळीऐवजी थर्माकॉल, प्लॅस्टिकचा वापर संकटाची चाहूल ठरत आहे.
पूर्वी ग्रामीण भागात लग्नसमारंभ किंवा धार्मिक कार्यक्रम असला जंगलातून पळस, कुडा झाडाची पाने गोळा केली जात होती. सायंकाळी लग्नाच्या घरात बसून गप्पा-गोष्टी, हास्यविनोदाच्या वातावरणात या पानांच्या पत्रावळी, द्रोण तयार केले जात. ही प्रक्रिया सामाजिक ऐक्य तसेच परस्पर सहकार्याचे उत्तम उदाहरण होते. पळसाच्या पत्रावळींवर जेवण घेण्याची परंपरा आरोग्यदायी मानली जात होती. विशेषतः पितृपंधरवड्यात (श्राद्धकाळात) पत्रावळींना विशेष धार्मिक महत्त्व होते. त्या काळात बाजारात मोठ्या प्रमाणात पळसाच्या पत्रावळी उपलब्ध होत होती. मात्र, आधुनिक जीवनशैली, वृक्षतोडीमुळे परंपरेला मोठा फटका बसला असून, थर्माकॉल, प्लॅस्टिकचा वापर वाढला आहे.
----------------------
पर्यावरणाचा समतोल ढासळला
पळसाच्या पत्रावळीवर जेवण घेणे, ही केवळ परंपराच नाही, तर आरोग्यासाठी हितकारक होती. झाडांचे संवर्धन, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशा नैसर्गिक साधनांचा वापर आवश्यक होता. मात्र, आजच्या पिढीचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाचे वाढते प्रश्न, प्लॅस्टिक प्रदूषण, आरोग्याच्या समस्या लक्षात घेता पारंपरिक, नैसर्गिक पर्यायांकडे वळण्याची गरज आहे.
--------------------
ग्रामीण भागात लग्न, मोठा कार्यक्रम असला की पत्रावळी तयार करण्यासाठी सगळे एकत्र येत होते. या प्रक्रियेत सामाजिक बंध अधिक मजबूत होत होता. मात्र, थर्माकॉल, प्लॅस्टिकच्या वापरामुळे ही सुंदर परंपरा पूर्णपणे हद्दपार झाली आहे.
- माणिक सांबरे, ज्येष्ठ नागरिक, विक्रमगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com