महावितरण मुख्यालयी वास्तव्यास कानाडोळा

महावितरण मुख्यालयी वास्तव्यास कानाडोळा
Published on

विजेच्या लंपडावाने जव्हारवासी हैराण
महावितरणाच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्षाचा फटका
जव्हार, ता. २६ (बातमीदार)ः नव्या पालघर जिल्ह्यात पायाभूत सुविधांची अजूनही वानवा आहे. डोंगर भाग असलेल्या जव्हार, मोखाडा तालुक्यात विजेची समस्या आहे. असे असताना महावितरणचे अधिकारी, कर्मचारी मुख्यालय ठिकाणी वास्तव्य करत नसल्याने समस्या अधिक जटिल बनली आहे.
जव्हार शहर भागात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महावितरण कार्यालयातील काही कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास नसल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे वीजपुरवठ्यातील बिघाड, फॉल्ट दुरुस्ती तसेच तातडीच्या तक्रारींवर वेळेत कारवाई होत नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे. महत्त्वाचे म्हणजे, महावितरणच्या नियमानुसार संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहणे अपेक्षित असते, पण जव्हार महावितरणमधील काही अधिकारी कर्मचारी बाहेरगावी राहत असल्याने रात्री-अपरात्री वीज खंडित झाल्यास तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न पडत आहे.
--------------------------
अडचणींचा सामना
शेतकरी, व्यापारी तसेच घरगुती ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आकस्मिक तांत्रिक बिघाडावेळी कर्मची प्रतिसाद देत नसल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. या प्रकाराकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
---------------------
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज खंडित होण्याच्या घटना वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपत्ती काळात अधिकारी उपलब्ध नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.
-एकनाथ दरोडा, अध्यक्ष, सरपंच संघटना
-------------------
जव्हार महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी व्यवस्था आहे. मात्र, तरीदेखील कुणी मुख्यालयी राहत नसेल, तर तशा सूचना देण्यात येतील.
- सुनील भारंबे, कार्यकारी अभियंता, पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com